Monday, November 19, 2012

इतिहासावर बाळासाहेब ठाकरे

इतिहासावर जगता येत नाही. इतिहास निर्माण करावा लागतो.
- चार दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवसा वाघासारखे जगा
- तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तरतोंडात वाजवून न्याय मिळवा... पणन्याय हा झालाच पाहिजे!
- सीमा भागासाठी केंद्राच्या विरोधात महाराष्ट्राकडून एक मोठा उठाव व्हायलाच हवा... आता अस्तन्या सावरून बसा... महाराष्ट्रा, तुला परत लढावेच लागेल!
- हा देश हिंदूंचा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जर तशी कोणाचीइच्छा नसेल तर हिंदू म्हणून जगता कशाला? सरळ सुंता करुन टाका...!
- मुंबई ही धर्मशाळा नव्हे, शहरात येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखायचे असतील तर परमीट योजनाच राबवायला हवी.
- आत्मचरित्रे पुस्तकांच्या कपाटात नको. लोकांच्या कपाटात हवीत!
- नियम आणि कायदे कोणासाठी? लोकांना जेरीस आणण्यासाठी? जाळून टाका ते कायदे... जनहिताच्याआड येणारे नियम आणि कायदे बदलायलाच हवेत...!
-साहेब

म्हणजे बाळासाहेब....

स्वतः बाळासाहेब ठाकरे एक विचार आहेत आणि विचार कधीच मरत नाहीत.

मराठी माझा श्वास आहे आणि हिंदुत्व माझा प्राण आहे, या एकाच विचाराने बाळासाहेब झपाटलेले होते.
महाराष्ट्रात नव्हे तर देशात शिवरायांची शिवशाही अस्तित्वात यावी, यासाठीच
बाळासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यांच पूर्ण आयुष्यच एका लढाऊ योद्ध्यासारख होत.

आजपर्यंत कित्येक नेत्यांनी स्वताच्या स्वार्थासाठी पार्टी स्थापन केली,
लोकांना फसवून सत्ता देखील उपभोगली, फक्त बाळासाहेब एकटेच असे होते कि ज्यांनी सामान्य लोकांसाठी 'शिवसेना' स्थापन केली, सामान्य जनतेचे
प्रश्न घेऊन प्रसंगी रस्त्यावर उतरले,
आणि जेव्हा सत्ता उपभोगायची वेळ
आली तेव्हा स्वतः मात्र बाजूला गेले
आणि शिवसैनिकांच्या हातीत मुख्यमंत्रीपद दिले. यालाच
म्हणतात निस्पृह राजकारणी...!

बाळासाहेब काटेरी फणसासारखे होते, बाहेरून कितीही कठोर दिसत
असले तरी आतून खूप गोड होते.
त्यांनी विरोधाला विरोध कधीच केला नाही,
त्यांचा विरोध विचारांना होता.

या आधी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला होता; आज पुन्हा एकदा महाराष्ट्र पोरका झाला असेच खेदाने
म्हणाव लागेल.

मंत्रालयावर भगवा फडकावणे हे
बाळासाहेबांचे स्वप्न होते, आता बाळासाहेबांच्या निधनानंतर तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र
येऊन बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करतील
आणि मंत्रालयावर सन्मानाने भगवा फडकवतील अशी अपेक्षा करू.

माझ्या या लाडक्या लढवय्या नेत्याला माझा अखेरचा सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली.... !! आता दुसरे बाळासाहेब
होणे नाही....!!

"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म
वाढवावा..."

बाळासाहेब फक्त तुमच्यासाठी....

"जगाने सर्कशीतील वाघ खूप पहिले असतील,
पण जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब...

मान खाली घालत दिल्लीत मुजरा करणारे
महाराष्ट्रातील भरपूर नेते असतील,
पण हिंदूंना ताठ मानेने जगायला शिकवणारे बाळासाहेब...

शिवाजी पार्कला सभा घेऊन नंगानाच करणारे खूप जन
बघितले,
पण शिवाजी पार्कचे 'शिवतीर्थ' म्हणजे बाळासाहेब...

नाकाला करणारे कितीतरी नकलाकार असतील,
पण आक्रमकतेची ओरीजनल कॉपी म्हणजे बाळासाहेब....

हिंदुस्तानातील सगळ्याच नेत्यांनी आतापर्यंत साहेब
म्हणून मिरवले,
पण सामन्यातील सामन्याने अगदी मनापासून
ज्यांना 'साहेब' मानले ते म्हणजे बाळासाहेब...

गुंडगिरी थांबवा म्हणायची सवय अनेक
पांढरपेश्या नेत्यांना होती,
पण आय-बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी प्रसंगी गुंड
झालेत ते म्हणजे बाळासाहेब...

स्वतःला सम्राट म्हणवणारे कित्येक जण पाहिले,
पण तब्येत खालावल्यावर रात्री १२ वाजता लाखो लोक
जमवणारे हिंदूहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब....

पक्षादेश देऊन स्वतः पळ काढणारे अनेक पक्षप्रमुख असतील,
पण स्वतः दिलेला आदेश पक्षादेश एक शिवसैनिक म्हणून
तंतोतंत पाळणारे म्हणजे बाळासाहेब....

पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणारे कितीतरी जण असतील,
पण शिवसैनिकांसाठी मातोश्रीवरचे 'विठ्ठल' म्हणजे बाळासाहेब....

हौसे, नौसे, गौसे भरपूर जण असतील,
पण त्या सर्वांचा 'बाळ' नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब...."

जब तक सुरज चांद रहेगा, बाळासाहेब तेरा नाम रहेगा....!
एका महामानवाला माझा मानाचा मुजरा....!!

जंगली वाघ

सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब
............... ............... ............... ...
दिल्लीत मुजरा करण्यासाठी खूपजन पळत
असतील

ताठ मानेने जगायला शिकवणे म्हणजे बाळासाहेब
............... ............... ............... ...
शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे खूप असतील
शिवाजी पार्क ला शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब
............... ............... ............... ...
कॉपी करणारे खूप होते आहेत आणि असतील
ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब
............... ............... ............... ...
हिंदुस्तानात खूप साहेब असतील
खरे साहेब म्हणजे बाळासाहेब
............... ............... ............... ...
गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप असतील
आया ,बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी गुंड होतात
म्हणजे बाळासाहेब
............... ............... ............... ...
स्वताला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील
लोक हृदयसम्राट म्हणतात म्हणजे बाळासाहेब
............... ............... ............... ...
पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच
स्वताला शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब
............... ............... ............... ...
सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे
बाळासाहेब
............... ............... ............... ...
हौसे, नौसे, गवसे खूप असतील
बाळ नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब..!!!!

Two legend


बाळासाहेब ठाकरे - मुंबई प्रवेशद्वार परप्रांतीयांसाठी बंद करा या मागणीसाठी गेट-वे ऑफ इंडियापाशी जमलेल्या मोर्चासमोर भाषण करताना बाळासाहेब.

बाळासाहेब.. बालपण आणि जीवन

बालपण आणि जीवन

जानेवारी, १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही

महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.
व्यंगचित्रकार

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.
'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
शिवसेनेची स्थापना

महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काही नाव सुचतय का संघटने साठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…” “मि सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दु-विधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.
‘सामना’ - दैनिक वृत्तपत्र

वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.
शिवसेना - भाजप युती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
हिंदुत्व

हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.

बाळासाहेब ठाकरे - बालाजी तांबे यांच्या पुस्तकाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बाळासहेब ठाकरे आणि 
अमिताभ बच्चन

बाळासाहेब ठाकरे - बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान श्री. चंद्रशेखर

पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लता मंगेशकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अभिनेत्री माधुरी दीक्षित व आदी मान्यवर उपस्थितीत होते. (छाया - दत्ता खेडेकर)

बाळासाहेब ठाकरे - बाळासाहेबांनी जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांनी पूर्ण निष्ठेन प्रयत्न केले. आणि महाराष्ट्रात उड्डाणपुलांचे जाळे उभे केले.
बाळासाहेब ठाकरे - आदित्य ठाकरे यांच्या म्युझिक अल्बमचे प्रकाशन करताना बाळासाहेब ठाकरे व अमिताभ बच्चन

बाळासाहेब ठाकरे - माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पुण्याची कृष्णा पाटील हिचा सत्कार करताना बाळासाहेब

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (सौजन्य- लालबागचा राजा डॉट कॉम)
बाळासाहेब ठाकरे - शिवसेनेच्या स्थापनेच्या काळातील बाळासाहेब.

बाळासाहेब ठाकरे - शिवसेनेच्या संघर्षाला अनेकदा पोलिसांची सहानुभूती मिळत असे.

बाळासाहेब ठाकरे - मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी काढलेला पहिला मोर्चा

बाळासाहेब ठाकरे - शिवाजी पार्क येथील सभेत प्रबोधनकार ठाकरे व श्रीकांत ठाकरे यांच्यासह बाळासाहेब.

बाळासाहेबांच्या चित्रमय स्मृती 3


बाळासाहेब ठाकरे - पार्ले येथील प्रचारसभेत बाळासाहेब.

बाळासाहेबांच्या चित्रमय स्मृती 2

बाळासाहेब ठाकरे - मुंबई प्रवेशद्वार परप्रांतीयांसाठी बंद करा या मागणीसाठी गेट-वे ऑफ इंडियापाशी जमलेल्या मोर्चासमोर भाषण करताना बाळासाहेब.

बाळासाहेबांच्या चित्रमय स्मृती..1.. ·


बाळासाहेब ठाकरे - हिंदुत्वाचा राजकीय अविष्कार बाळासाहेबांनी घडवून आणला आणि एक झंझावात महाराष्ट्रभर सुरू झाला. बाळासाहेबांनी चैतन्यदायी सभांचा सपाटाच सुरू केला.

बाळासाहेब ठाकरे - उद्धव व राज ठाकरे यांच्यासह बाळासाहेब


बाळासाहेब ठाकरे - उद्धव व राज ठाकरे यांच्यासह बाळासाहेब

ठाकरे कुटुंबीय...!!!

महाराष्ट्र केसरी


" पंजाब केसरी" (पंजाब के शेर ) लाला लाजपत राय और "महाराष्ट्र केसरी" बालासाहब दोनों की पुण्यतिथि एक ही दिन 17 नवम्बर ..... अजब संयोंग !

'फ्री प्रेस जर्नल'च्या कार्यालयात.

श्री. यशवंतराव चव्हाण

बाळासाहेब ब-याचदा 'मावळा' या टोपणनावाने चित्र काढत.

aalingan

balatakare


'फ्री प्रेस जर्नल' मध्ये नोकरी करत असल्यामुळे बाळासाहेबांना इतर नियतकालिकांमधून चित्र काढण्याची परवानगी नव्हती. तो काळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवणीचा होता. आचार्य अत्र्यांचा 'मराठा' चळवळीच्या अग्रस्थानी होता. अत्र्यांच्या विनंतीला मान देऊन बाळासाहेब ब-याचदा 'मावळा' या टोपणनावाने चित्र काढत.

balasaheb core image

बाळासाहेबांनी रेखाटलेली काही अर्कचित्रं.
१. जिमी कार्टर
२. कुश्चेव्ह
३. प्रेसिडेंट अयुब
४. मार्शल टिटो

५. हॅरॉल्ड मॅकमिलन
६. राणी एलिझाबेथ
७. सोनापती बापट
८. स्वातंत्र्यवीर सावरकर
९. प्रबोधनकार ठाकरे